३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
पुणे
Pune police पुण्यात ५५ वर्षीय प्राचार्य महिलेला गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सात लाख रुपयांची खंडणी उकळली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे असे या पोलिसांची नावे आहेत. "१८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तुम्हाला अटक होईल," असे धमकावून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

Pune police bribery case, police officers Ajit Bade, 
मिळालेल्या माहितीनुसार, Pune police हा सगळा प्रकार जुलै २०२५ मध्ये सुरू झाला. पुण्यातील एका महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे एका विद्यार्थिनीचे महाविद्यालय प्रवेशावेळी जमा केलेल्या कागदपत्र होते. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक बडे यांनी महाविद्यालयात जाऊन थेट प्राचार्य यांना धमकी दिली. "एका विद्यार्थीनीला तुम्ही बंदुकीचा धाक दाखवुन गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे. तुमच्या संस्थेची बदनामी होवु नये, म्हणुन मी हा अर्ज रेकॉर्डवर न घेता आपल्याला भेटायला आलोय. ती मुलगी रडत असल्याने आमच्या पथकातील हिंगे यांनी तिला समजावून सांगितले आहे," असं बडे यांनी फिर्यादी यांना सांगितलं असल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.
"तुमच्या संस्थेची बदनामी टाळण्यासाठी १०Pune police लाख रुपयांवर तिला तयार केले आहे," अशी बतावणी बडे यांनी केल्यावर. फिर्यादी यांनी ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी देण्यास तयार झाले आणि रक्कम सुद्धा दिली. यावर्षीच्या ८ मार्च रोजी, पुणे पोलिसांच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने प्राचार्यांना बोलावून संबंधित मुलीने बडे आणि हिंगे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांचा विरुद्ध दिलेला तक्रारी अर्ज दाखविला आणि हा सगळा प्रकार समोर आला. चौकशी दरम्यान, आपल्या बाबतचा सगळा प्रकार प्राचार्य यांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलिस आयुक्त यांच्या आदेशानंतर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बडे हे सद्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत, हिंगे या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे, तर सुदाम तायडे हे देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत