आभासी पद्धतीने सुरू होता खेळ
बेकायदेशीर अॅपचा वापर
अमरावती,
Raid on IPL betting in Amravati शहर गुन्हेशाखेच्या पथकाने आय.पी.एल. सामन्यावर ऑनलाईन बेटींग करणार्यावर धाड टाकून एकूण ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासून ही पहिलीच कारवाई आहे. पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेची विशेष बैठक घेऊन शहरात चालणार्या आयपीयल सामन्यांवर होणार्या बेटींग बाबत प्रभावी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांचे नेतृत्वात पथकाने कारवाई केली. ८ एप्रिल रात्री माहिती मिळाली की, दस्तुर नगर येथील मनपा उद्याना समोर एक इसम हा मोबाईल फोनच्या सहाय्याने लोकांना लिंक देऊन ऑनलाईन बेटींग सट्ट्याचा जुगार खेळवित आहे. त्या आधारावर पथकाने दस्तुर नगर येथील मनपा उद्यानाजवळ येत छापा टाकला. त्यावेळी मोबाईलमध्ये गैरकायदेशीर ऑनलाईन बेटींग आयडीच्या सहाय्याने दिल्ली कॅपीटल्स विरूध्द गुजरात टायटन्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणे सुरू होते. अॅपमध्ये दाखवीत असलेल्या भावानुसार पैशांची हारजीतही दिसून आली.
Raid on IPL betting in Amravati सदर व्यक्ती ताब्यात घेतले असता त्याने गिरीश उर्फ प्रिंन्स संजय दादलानी (वय २० वर्ष, रा. कलोती नगर सराफ लेआउट), असे सांगितले. त्याच्याकडून आयफोन होता. त्याची तपासणी केल्यावर मोबाईलमध्ये ओएसटीआयएन७७७ या नावाचे क्रिकेट बेटींगचे गैरकायदेशीर अॅप दिसून आले. त्यावर तो लोकांना आयडी देऊन ऑनलाईन बेटींग करायला लावत होता. सदर मोबाईल व जुगाराचे साहीत्य पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. नमुद आरोपी हा अवैध्यरीत्या सरकारने प्रतिबंधीत केलेल्या बेटींग अॅपचा गैरकायदेशिररित्या कुठल्याही प्राकरचा कर न भरता वापर करून सरकारची फसवणूक करताना मिळून आला. नमुद आरोपीने आय.डी. ऑनलाईन घेऊन स्वतःचे फायद्यासाठी व दखलपात्र गुन्हा करण्यासाठी वापरून लोकांची फसवणूक केली असल्याचे दिसून आला. नमुद आरोपीविरोधात पोलिस स्टेशन फेजरपुरा येथे बि.एन.एस. तसेच महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोउपनि गजानन सोनुने, पोलिस अंमलदार दिपक सुंदरकर, सुनील लासुरकर, जहीर शेख, सचीन बहाळे, अतुल संभे, सुरज चव्हाण, राजिक रायलीवाले, योगेश पवार यांनी केली आहे.