कौतुकास्पद! तलावाच्या पाण्याने फुलशेतीत नवा इतिहास

नागेश ठाकूर यांचे प्रेरणादायी प्रयोग

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
रायगड
Raigad floriculture ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकरीबंधूंनी प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. ठाकूरबेडी येथील प्रगतिशील शेतकरी नागेश ठाकूर यांनी तलावाच्या पाण्याचा वापर करून फुलशेतीत यश मिळवले आहे, ज्यामुळे त्यांचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.
 

Raigad floriculture, Nagesh Thakur, 
खारेपाट विभाग गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. या भागातील शेतीला सतत नुकसान होत असले तरीही ठाकूरबेडी येथील नागेश ठाकूर व गंगाधर ठाकूर यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर तलावातील पाणी नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने वापरून फुलशेती, फलशेती व हळद लागवड यशस्वी केली आहे.शेतकऱ्यांच्या या प्रयत्नामुळे बाजारात फुलांची सतत मागणी असल्याने Raigad floriculture  शेवंती, झेंडू तसेच इतर फुलांची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. ठाकूरबंधूंनी राबवलेल्या नव्या संकल्पनेनुसार फुलांना बाजारात १५० ते १८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.तलावाच्या पाण्याचा योग्य उपयोग करून फुलशेतीत यश मिळवल्यामुळे पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकरीबंधूंना स्थानिक प्रशासन आणि सहकाऱ्यांकडून कौतुक मिळत आहे. या उपक्रमामुळे अन्य शेतकऱ्यांनाही पाण्याचा शाश्वत वापर करून शेतीत नफा वाढवता येईल, याचे धडे मिळत आहेत.नागेश ठाकूर यांचा हा प्रयत्न खारेपाट भागातील पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी आणि शेतीत नव्या संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.