राष्ट्रसंत अभ्यासक्रमासाठी प्रयत्न : - कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नागपूर ,
Rashtrasant Tukdoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यावर आधारित अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, तसेच महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत व विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी दिले.
  
sant
 
माजी उपमहापौर शेखर सावरबांधे व ज्ञानेश्वर रक्षक यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारित शिक्षणातून सक्षम विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.Rashtrasant Tukdoji Maharajदरम्यान अभ्यासक्रमाला यूजीसी मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांना आचार्य पदवी मिळत नसल्याची बाब समोर आली असून, या संदर्भातही सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र