लोकशाहीचा उत्साह उसळला! पुदुच्चेरी-आसाम-केरळमध्ये विक्रमी मतदान

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
record-voting : देशातील पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पुदुच्चेरीत जवळपास ९० टक्के, आसाममध्ये सुमारे ८५ टक्के आणि केरळमध्ये सुमारे ७८ टक्के मतदान नोंदवले गेले आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
 
 
 
record-voting
 
या तिन्ही ठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या आणि दिवसभर उत्साह कायम राहिला. निवडणूक आयोगाने शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडल्याची माहिती दिली असून, या निवडणुका राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. दरम्यान, या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून, त्यातून संबंधित राज्यांतील पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.