नागपूर :
Respect for womanhood कवयित्री व बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सरोज अंदनकर यांना पुणे येथे ‘सर्जनशील शब्दवेल नारीशक्ती सन्मान’ प्रदान करण्यात आला. हा सोहळा ५ एप्रिल रोजी सिंहगड, पुणे येथे पार पडला.
या कार्यक्रमात नोकरी व कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. अंदनकर यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रवीण बोपुलकर, अश्विनी अतकरे, देवेंद्र इंगळकर, अमोल चरडे आदी मान्यवर उपस्थित होते. Respect for womanhood याच दिवशी पुण्यातील वानवडी येथे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘आदर्श साहित्य रत्न’, ‘कर्तृत्ववान नारीशक्ती’ व ‘समाजरत्न’ असे अन्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौजन्य:वर्षा किडे,कुळकर्णी / संपर्क मित्र