नागपूर,
Ghosh Pathak संघाच्या घोष पथकाच्या स्वयंसेवकांनी बुधवारी सायंकाळी विविध रागांवर आधारित अप्रतिम रचना सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कुठेही न चुकता, न अडखळता, आवश्यक स्थिर, चलन व मंद चलन, ताला-सुरात एकतेचे दर्शन घडविले.
रा.स्व. संघ शताब्दी निमित्ताने घोष पथकाच्या इतिहासावर आधारित ‘राष्ट्र स्वराधना’ या हस्तलिखित ग्रंथाचे प्रकाशन रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी झाले. विदर्भ संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक शीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी घोष पथकाचे ज्येष्ठ नागांग वादक अशोक दवंडे यांनी प्रास्ताविकात हस्तलिखित ग्रंथाविषयी माहिती दिली. डॉ. मृणालिनी बांडे, मिनाक्षी पुराणिक, हर्षद भिसीकर, पराग दाभाडे, विनायक गोगटे, आदित्य बेलसरे, पिनाक दलाल, अभिषेक बेदरकर, मनोज घरोटे, आशीष जोशी आदींचे सहकार्य यासाठी लाभले.
शंख वादकांनी निकोलस, एप्रिस, विराज, ब्रह्मपुत्र, भारत, दीप, तथागत, निनाद, वर्धमान, आनक वादकांनी स्टर्डी, फॉकलँड, वीरश्री, तालविन्यास, पिनाक, तेजस, श्रुंग वादकांनी गोरख कल्याण, देशकार, जननी, धन धान्ये पुष्पे भरा (बंगाली), जयो स्तुते, रामरंजनी, दुर्गा आदींसह घोष पथकाने सांघिक आणि वाद्यानुसार 27 रचना सादर केल्या.
प्रारंभीच्या 5 रचनांपैकी 4 इंग्रजी होत्या. त्या आधी Ghosh Pathak सादर केल्या जात होत्या. पण, नंतर सर्व भारतीय रचना तयार करण्यात आल्या. विराज ही मंद चालीतील विशेष रचना आहे. तालविन्यास ही एक विशेष रचना असून शारिकांचा टिक टिक ध्वनीने वाजवली जाते. पणव, झल्लरी, त्रिभुज, स्वरद, तूर्य, वंशी आदी वादकही होते.
देशात जिथे-जिथे घोष पथक आहे तिथे नागपूरचे घोष पथक आदर्श मानले जाते. आज सादर रचनांनी हे स्थान कायम असल्याचे सिद्ध झाले. अलंकार जोशी यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाची सूत्रे अमर कुळकर्णी यांनी सांभाळली. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का. अ. भा. कार्यवाहिका सीता अन्नदानम, संघाचे अ.भा. शारीरिक प्रमुख जगदीश प्रसाद, अ.भा. सह प्रचारक प्रमुख सुनील कुळकर्णी, रवींद्र जोशी आदींसह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.
------------------------------- -----------------------------------