पत्रपरिषदेत समितीचे अध्यक्ष खडसे यांची माहिती
वर्धा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने समता दौड, रोजगार मेळावा, स्टार्टअप मार्गदर्शन आणि बुद्ध-भीम गीतं, हेल्थ अॅण्ड वेल्थ 'Samta Daud' and job placementअंतर्गत समता दौड आणि जॉब प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेश खडसे यांनी दिली.
स्थानिक विश्रामगृहात आज ९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सचिव शारदा झामरे, राजीव वानखेडे, अविनाश काकडे, डॉ. शरद सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. खडसे पुढे म्हणाले, ‘वूई आर इंडियन्स फर्स्ट अॅण्ड लास्टली’ ही यंदाची थिम असून ११ रोजी महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून समता दौडला प्रारंभ होईल. तीन गटात होणार्या या स्पर्धेत खुल्या गटासाठी १० किमी, ज्येष्ठांसाठी ५ तर मुलांसाठी ३ किमीचे अंतर ठेवण्यात आले आहे. ११ रोजी सकाळी ६ वाजता उत्तम कांबळे यांच्या प्रबोधनात्मक प्रवचन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून छाया खोब्रागडे राहतील.
'Samta Daud' and job placement बेरोजगारांसाठी १२ रोजी करिअर फेअर व जॉब प्लेसमेंटचे आयोजन असून आतापर्यंत ७०० ते ८०० मुलांनी नोंदणी केली. या रोजगार मेळाव्यात आयटी, बँक सेटर, इन्शूरन्स आदी ३५ कंपन्या सहभागी होणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यात ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठी स्कील डेव्हलपमेंटवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली. सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वाजता नृत्य स्पर्धा, १३ रोजी सकाळी ९ वाजता स्टार्ट अपवर मार्गदर्शन तर रात्री ९.३० वाजता भीमकन्या लेझीम ग्रुपचे लेझीम नृत्य होईल.
१४ रोजी पहाटे ५ वाजता उडाण ग्रुपतर्फे भीम वाघिणींची मानवंदना, सकाळी ६ वाजता मीरा भालेराव यांचा सकाळ निळ्या पाखरांची, समाजकल्याण विभागातर्फे सकाळी ९ वाजता समतादूत मार्गदर्शन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता डॉ. हर्षदीप कांबळे यांचा मार्गदर्शन कार्यक्रम तर ७ वाजता गायिका गुणगुण रनयेवले यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. अमर काळे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ उपस्थित राहतील.