७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार

भोंदू अशोक खरातचा करणामा

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली असून, आज गुरुवारी त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.
 

Ashok Kharat  
कोर्टात तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्रे आणि लॅपटॉप आणून महत्वाचे पुरावे सादर केले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, खरातने महिलांवर लैंगिक अत्याचार करताना लॅपटॉप समोर ठेवून व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. यामध्ये ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे धक्कादायक खुलासे पोलिसांनी कोर्टात केले.
न्यायमूर्ती बी. एन. इचपुराणिक यांच्या समोर झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील, तपास अधिकारी आणि आरोपीचे वकील उपस्थित होते. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले की, आरोपीने सातव्या महिन्यात विशिष्ट विधी करून महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. तसेच, बाजारात चिंचोके पॉलिश करून लाखो रुपयांना विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे.तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने लैंगिक अत्याचार करताना Ashok Kharat  नकली साप, नाग, वाघाचे कातडे दाखवले, तसेच लॅपटॉपसमोर व्हिडीओ तयार केले. या घटनेमुळे आरोपीच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येते. पोलिसांनी कोर्टात म्हटले की, आरोपी हुशार आणि चाणाक्ष असून, चौकशीत सहकार्य करत नाही.आगामी तपासात नकली साप, नाग व वाघाचे कातडे कुठून आणले गेले, नकली खडे कोणाकडून मिळाले, तसेच आरोपीने केलेल्या लैंगिक अत्याचारांचे संपूर्ण तपशील पोलीस समोर आणण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे समाजामध्ये मोठी खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.