सिक्कीम,
Sikkim landslide उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामुळे संपूर्ण भागात मोठी आपत्ती निर्माण झाली असून, रस्ते आणि पूल कोसळल्याने अनेक पर्यटक दुर्गम भागात अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन हिम सेतू’ ही विशेष बचाव मोहीम हाती घेतली असून, प्रतिकूल हवामानातही सुटका कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे तारुम चू परिसरातील महत्त्वाचा रस्ता आणि पूल कोसळल्याने लाचेन आणि चुंगथांग दरम्यानचा संपर्क पूर्णपणे तुटला. पूल कोसळल्यामुळे १ हजाराहून अधिक पर्यटक अडकले असून भारतीय सैन्याकडून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पर्यटन करीत आहे. या घटनेमुळे हजाराहून अधिक पर्यटक अडकून पडले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरने तात्काळ हालचाली करत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत शेकडो पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येत आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही जवानांनी घटनास्थळी तात्पुरता पादचारी पूल उभारून बचावकार्य सुरू ठेवले आहे. या पुलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित भागात आणून पुढील प्रवासासाठी गंगटोककडे हलवले जात आहे.
या मोहिमेत सीमा रस्ते Sikkim landslide संघटना, स्थानिक प्रशासन आणि इतर आपत्कालीन यंत्रणाही सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. बर्फ हटवणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सततचा पाऊस, हिमवृष्टी आणि उंच डोंगराळ भागामुळे बचावकार्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने पर्यटक त्या भागात अडकलेले असून, त्यांची टप्प्याटप्प्याने सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे हिमालयीन भागातील नैसर्गिक आपत्तींचा धोका पुन्हा अधोरेखित झाला असून, प्रशासनाने नागरिकांना अशा परिस्थितीत अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सर्व पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवले जाईपर्यंत ‘ऑपरेशन हिम सेतू’ अंतर्गत बचावकार्य सुरू राहणार असल्याचे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.