सोयाबीन, मका आणि गहूचे भाव स्थिर

कैरी व काकडीला चांगला उठाव

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
मुंबई
Soybean prices देशातील शेतमाल बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन, मका, गहू तसेच काही भाजीपाला पिकांमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या भावात कालपासून काहीसा चढ उतार सुरु असून, सध्या सोयाबीनला चांगला उठाव दिसत आहे. बाजारातील आवक कमी असल्याने भाव सरासरी ५,१०० ते ५,५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल विकले जात आहेत. बाजार विश्लेषकांच्या मते, युध्दासंबंधी घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा काही प्रमाणात परिणाम भावावर दिसत आहे. पुढील काळात सोयाबीनचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.
 

Soybean prices, maize prices, 
मक्याच्या बाजारातही मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली आहे. मक्याला सध्या चांगला उठाव असून, बाजारातील आवक अनेक भागात कमी असल्यामुळे सरासरी भाव १,७०० ते १,९०० रुपयांपर्यंत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, आवक कमी राहिल्यामुळे मक्याचे भाव पुढील काळात कायम राहू शकतात.
 
 
गहूच्या बाजारात मागील काही दिवसांपासून आवक वाढत असून, यंदा गव्हाचे उत्पादन चांगले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गव्हाची मागणी स्थिर आहे, मात्र बाजारावर आवकेचा दबाव असल्यामुळे हमीभावापेक्षा किंचित कमी भावात गहू विकले जात आहे. यंदा सरकारने गव्हासाठी २,५८५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे, तर बाजारात गहू २,२०० ते २,७०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, गव्हाच्या भावावरील दबाव अजून काही दिवस कायम राहू शकतो.
 
 
राज्यातील बाजारात Soybean prices कैरीला मागील काही दिवसांपासून चांगला उठाव मिळत आहे. सध्या कैरीला २,२०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहेत. आंबा पिकाला वादळी वारे व गारपीटीचा तडाखा बसल्यामुळे आवकावर परिणाम झाला असून, पुढील काळात भावावर काही प्रमाणात दबाव राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व शेतकरी व्यक्त करत आहेत.
 
 
काकडीला सध्या राज्यभरात Soybean prices चांगला उठाव मिळत आहे. उन्हाचा तडाखा आणि मागील आठवडाभरातील वादळी पावसामुळे काही भागातील काकडी पिकाला फटका बसला आहे. तरीही बाजारात काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १,२०० ते १,४०० रुपये भाव मिळत आहेत. विश्लेषकांच्या मते, पुढील काळात काकडीचे भाव चांगले राहतील आणि शेतकऱ्यांना पुरेशा भावात विक्री करता येईल.
एकंदरीत, देशातील शेतमाल बाजारात सोयाबीन, मका आणि गहूच्या भावात स्थिरता दिसून येत आहे, तर कैरी व काकडीसारख्या काही भाजीपाला पिकांना चांगला उठाव मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न काही प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे.