गोरेगावमध्ये चोरट्याला दोन तासांत अटक

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
- रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी जप्त

गोंदिया, 
Thief arrested गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत बसस्टॉपवर खिसा कापून चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी आज 9 एप्रिल रोजी केली. साहिल इसराइल शेख (१९), रा. संजय नगर, गोंदिया असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
atakdksldsl
Thief arrested  पोलिसांनी आरोपीवर कलम ३०३(२) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी हा आपल्या गावाकडे जाण्यासाठी गोरेगाव बसस्टॉपवरून बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्याचा खिसा कापून सुमारे ४ हजार रुपये रोख रक्कम व अंदाजे १६ हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन लंपास केला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी साहिल इसराइल शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. दरम्यान, अधिक चौकशीत आरोपीने अप क्र. १५१/२०२६ मधील होंडा कंपनीची डिओ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.