पाकिस्तानात US-इराण चर्चा; कोण-कोण राहणार हजर?

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
us-iran-talks-in-pakistan : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वाच्या चर्चांची तयारी सुरू असून या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेत अमेरिकेच्या वतीने विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरार्ड कुशनर सहभागी होण्याची शक्यता आहे, तर काही अहवालांनुसार उपराष्ट्रपती जेडी वॅन्सही प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करू शकतात.
 
 
us-iran-talks-in-pakistan
 
 
 
इराणच्या बाजूने परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसद अध्यक्ष बाघेर गालिबाफ सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डारही या चर्चेत सहभागी होणार असून पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.
 
याशिवाय सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या देशांचे वरिष्ठ राजनैतिक प्रतिनिधीही या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रामुख्याने पश्चिम आशियातील तणाव कमी करणे, युद्धविराम टिकवणे आणि प्रादेशिक स्थैर्य निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
 
दरम्यान, इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी पोहोचत असल्याची पुष्टीही करण्यात आली असून या बैठकीतून पुढील संघर्ष थांबवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
ही चर्चा यशस्वी ठरल्यास अमेरिका-इराण संबंधांमध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण होईल.