विदर्भ साहित्य संघ चिटणीसपदी विवेक कवठेकर

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
डॉ. देवेंद्र पुनसे सहसंचालक

यवतमाळ, 
'Vidarbha Literary Association' विदर्भ साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळ निवडणुकीमध्ये ‘सृजन सेतू’ पॅनेलने एकहाती विजय प्राप्त केला. अध्यक्ष म्हणून डॉ. गिरीश गांधी तर कार्यकारी सदस्यपदी या पॅनेलचे 22 पैकी 21 उमेदवार विजयी झाले. 2026 ते 2031 या पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या अध्यक्षांसह नूतन कार्यकारणीचे पदग्रहण बुधवार, 1 एप्रिल रोजी वि. सा. संघात पार पडले. या कार्यकारिणीत यवतमाळच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक कवठेकर यांच्याकडे विदर्भ साहित्य संघाचे चिटणीस म्हणून विदर्भातील शाखांचे समन्वयक अशी जबाबदारी दिली आहे. तर डॉ. देवेंद्र पुनसे यांच्याकडे सांस्कृतिक संकुल समितीचे सहसंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
 
 
vivek
 
Vidarbha Literary Association'  विवेक कवठेकर हे येथील विवेकानंद विद्यालयातील पर्यवेक्षक, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे सहसचिव तथा संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री आहेत. लेखक, पत्रकार, वक्ते, संघटक व कार्यक्रम संयोजक म्हणून त्यांना दीर्घ अनुभव आहे. या कार्यकारिणीत सहसंचालक असलेले डॉ. देवेंद्र पुनसे हे मराठी, इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांच्या ‘पोळा आणि बाहुली’ या दीर्घकथा संग्रहाला महाराष्ट्र सरकारचा ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ मिळाला आहे. विविध मान्यवर साहित्य संस्थांचे सोळा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. वि. सा. संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व सरचिटणीस विलास मानेकर यांच्या मार्गदर्शनात, तसेच सर्व सदस्यांच्या सहयोगातून साहित्य सेवेचे कार्य सुरू राहील, असा विश्वास नियुक्तीनंतर विवेक कवठेकर व डॉ. पुनसे या यवतमाळकरांनी व्यक्त केला.