अन्यथा प्रशासनास सहकार्य करणार नाही; प्रहार शिक्षक संघटनेचा इशारा
वर्धा,
Voter list revision नियुक्त बीएलओ शिक्षक/कर्मच्यार्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने व बीएलओ शिक्षकांना नागरीकांकडुन धमया, लुटमारी सारख्या घटना घडत आहेत. ७ रोजी वर्धेतील आनंदनगर परिसरात एका शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटना घडू नये यासाठी कॅम्पचे आयोजन करुन मॅपिंगचे काम करावे अन्यथा शिक्षक जणगणनेच्या कामात प्रशासनाला सहकार्य करणार नाही या इशार्याचे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
Voter list revision मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात शिक्षक, कर्मचार्यांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुती करण्यात आली आहे. त्यामध्ये काही शिक्षक, कर्मचार्यांच्या अडचणी असताना त्यांच्या अडचणी लक्षात न घेता काम न स्वीकारल्यास गुन्हा दाखल करणे, सेवेतून निलंबित करणे, सेवेतून बडतर्फ करणे अशा प्रकारे दडपशाहीचा वापर केल्या जात आहे. मुळात बोर्ड परीक्षा, शालेय परीक्षा, पेपर्स तपासणे, निकाल तयार करणे व त्यात जणगणनेचे काम त्यामुळे शिक्षक, कर्मचारी पुर्णतः गोंधळून गेलेला आहे. नागरिक, मतदारांमध्ये जनगणनेबाबत कोणतीही जागृती नसल्याने नियुत बी.एल.ओं.ना दारोदारी भटकून काम करावे लागत आहे. दरम्यान, ७ रोजी काम करीत असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम करीत असताना त्यांची लूटमार करण्यात आली. तर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम करीत असताना त्यांना कुत्र्याने चावा घेतला, अशा वातावरणामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीएलओंना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून द्यावे, त्यांच्या जीविताची हमी घ्यावी तसेच शिक्षक, कर्मचार्यांना वेठीस धरण्यात येऊ नये. निवेदनात नमूद मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास कामात प्रशासनाला सहकार्य करणार नाही असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.