नागरिकांनी अचूक माहिती द्यावी : प्रशासनाचे आवाहन
झरी जामनी,
Voting census मतदारयादी अधिक अचूक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी झरी जामणी तालुक्यातील एसआयआर मॅपिंगची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहकार्य करणे आवश्यक आहे. घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम सुरू असून प्रत्येक मतदाराने जबाबदारीने तपशिल अचूक द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मतदारांनी घरी भेट देणाèया मतदान केंद्रस्तर अधिकाèयांना कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, त्यांचे नातेसंबंध, घर क्रमांक, पत्ता स्पष्ट व पूर्ण स्वरूपात द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अपूर्ण किंवा अंदाजाने माहिती दिल्यास पुढील प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Voting census विवाहित मुली व सुना यांच्याबाबत महत्वाचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. सासरी गेलेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या मतदार यादीतील भाग क्रमांकाची माहिती मिळणे आवश्यक आहे. पालकांनी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवावी. घरात आलेल्या सुनांच्या माहेरच्या मतदार यादीसंबंधीत तपशील व त्यांच्या वडिलांची माहिती संकलित करून ठेवावी. संबंधित नोंद 2002 च्या मतदार यादीत अपलब्ध नसल्यास आजी-आजोबांची माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे एका कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच मतदान केंद्राशी संलग्न होणार आहेत. मतदानाच्या वेळी होणाèया अडचणी कमी होणार आहेत. मयत, स्थलांतरित किंवा अपात्र व्यक्तींची नावे वगळल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे. त्यामुळे मतदारयादी अधिक विश्वसनीय होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले. ही मोहीम केवळ औपचारिकता नसून लोकशाही बळकट करण्याचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाने जागरुक नागरिक म्हणून सहभाग नोंदवून या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन तहसीलदार अक्षय रासने यांनी केले.