नाल्याच्या खोलिकरणात कृषी विभागाची खोट्याची उधळण!

    दिनांक :09-Apr-2026
Total Views |
आ. कुणावार यांनाही दिली चुकीची माहिती
 
 
सिंदीरेल्वे, 
Wardha Agriculture Department News नजिकच्या हेलोडी-हिवरा शिवारात १ हजार फूट लांब नाल्याचे खोलिकरण केल्याचा बनाव कृषी विभागाने केल्याची तक्रार आहे. मजेदार बाब म्हणजे कामचुकार अधिकार्‍यांनी ही खोटी माहिती आ. समीर कुणावार यांना दिल्याची माहिती श्रीराम कुरसंगे यांनी सांगितले.
 
 

nala
 
 (संग्रहित छायाचित्र )
 
Wardha Agriculture Department News कुरसंगे, देवाजी धुर्वे आदी अर्धा डझन शेतकर्‍यांनी ही शुद्ध बनवाबनवी असून साधे २० फूट लांब देखील नालीचे खोलिकरण झालेच नाही असे ६ एप्रिल रोजीच्या तक्रारीत नमूद आहे. नाल्याचे पाणी पावसाळ्यात शेतकर्‍यांसाठी शाप ठरतो असे सहा महिन्यांपूर्वी निवेदनाच्या माध्यमातून गांवकर्‍यांनी अधिकार्‍यांना कळविले होते. परंतु, मुजोर व कामचुकार तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काम केव्हाच पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठांना दिली. एवढेच नाही तर या महाभागांनी तोच अहवाल आ. समीर कुणावार यांना पाठवल्याचे सांगण्यात येते. नाल्या जवळ ज्यांची शेती आहे त्यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी या बोगस कामाचा पर्दाफास करणारी लेखी तक्रार जिल्हा कृषी अधीक्षकांना सादर केली. या बनवाबधवीत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी व एक महिन्यात यंत्राद्वारे नाल्याचे खोलिकरण करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.