समुद्रपूर,
Fire in Microplast company premises तालुयातील जाम येथील माइक्रोप्लास्ट पॉलिटेस प्रा. लि. कंपनी परिसरात प्लास्टिक वेस्टेजला भीषण आग लागली. बाहेरील वणव्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तत्काळ हिंगणघाट येथील अग्निशामक दलाला कळविले.
Fire in Microplast company premises हिंगणघाट नगरपरिषदेचे अग्निशामक अधिकारी गौरव गाणार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल ढोळस, किशोर समर्थ, ओम लडी, वैभव ऐगंधवार आणि अमित साहारे यांच्यासह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. प्लास्टिक वेस्टेज असल्यामुळे आग वेगाने पसरत होती. मात्र अग्निशामक दलाने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. या बचावकार्यात कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट अग्निशामक दलानेही मोलाची मदत केली. अनेक तासांच्या परिश्रमानंतर आग पूर्णपणे आटोयात आणण्यात यश आले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.