दारव्हा शहर विकासाचा संकल्प : पालकमंत्री संजय राठोड

    दिनांक :10-May-2026
Total Views |
बचत भवन, शाळा आणि क्रीडा संकुलाचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे भूमिपूजन

यवतमाळ, 
दारव्हा शहरातील नवनिर्मित बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, बचत भवन आणि उच्च प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे भूमिपूजन Guardian Minister Sanjay Rathod पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी दारव्हा शहराच्या विकासाचा संकल्प केला असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. ह लोकार्पण व भूमिपूजन सोहळा नवनिर्मित क्रीडासंकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भोरे, तहसीलदार राजेंद्र पौळ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, नप सभापती, नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
sanjay dksl
 
पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, आमचा अजेंडा विकासाचा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मतदारसंघांचा विकासही केला जात आहे. आज बचत भवन, शाळा, क्रीडासंकुल निर्मिती आणि दारव्हा शहराच्या वैभवात भर पडेल अशा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची निर्माण करण्यात येईल. दारव्ह्यातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. दारव्हा शहरातील व्यापार वाढविण्यासाठी व्यापारी गाळे उभारण्यात येणार आहे. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे.
 
 
दर्जेदार शाळा निर्मिती, छोट्या व्यापाèयांसाठी अल्पदरातील गाळे उपलब्ध केले जाणार आहे. बचत गटासाठी मोठा उद्योग आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दारव्हा शहरातील विविध विकासकामांमुळे शहराचा कायापालट होत असल्साचे Guardian Minister Sanjay Rathod  पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. तसेच बचत भवन, शाळा आणि क्रीडा संकुलातील सुविधांचा चांगल्या रितीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खा. संजय देशमुख म्हणाले, दारव्ह्यातील नवनिर्मित शासकीय वास्तू दिशादर्शक आहेत. पोलिस ठाणे, बचतभवन, नगर परिषद मराठी शाळेची चांगली निर्मिती झाली आहे. क्रीडा संकुल हा युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा मॉडेल प्रकल्प आहे. अशा सुविधा संपूर्ण जिल्ह्यात सुरू कराव्यात, अशी सूचना करून त्यांनी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे आणि शंकुतला ब्रॉडगेज रेल्वेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील विकास कामांची माहिती दिली. यावेळी नप अध्यक्ष सुनील चिरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी दारव्ह्यातील विकासकामांची माहिती दिली.
शासकीय सेवेत निवड झालेल्या 22 जणांचा सत्कार
दारव्हा येथे दोन वर्षांपूर्वी नवीन अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाèया 22 युवक-युवतींची विविध शासकीय सेवेत निवड झाली. या निवड झालेल्यांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.