धानोरा,
ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे MLA Dr. Milind Narote आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सनियंत्रण व सल्लागार समितीच्या बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान रुग्णालयातील कामकाजातील त्रुटींवर गंभीर चर्चा करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या.
MLA Dr. Milind Narote आपल्या जबाबदारीत हलगर्जीपणा करणार्या संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर योग्य कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले. तसेच ईसीजी निदानामध्ये तांत्रिक अचूकतेसोबतच वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष अनुभवाला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. पोस्ट मॉर्टम कक्षात आवश्यक सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले. गरोदर माता व अस्थिव्यंग रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना विनाकारण इतरत्र संदर्भित न करता स्थानिक पातळीवरच संवेदनशीलपणे उपचार देण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.