तब्बल ३.८६ कोटींची प्रकरणे निकाली
वाशीम,
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, ९ मे २०२६ रोजी जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये National Lok Adalati राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीचे उद्घाटन उपस्थित पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले.
National Lok Adalati यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यन, जिल्हा न्यायाधीश-१ जे. पी. झपाटे तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली ३ हजार ६०३ प्रकरणे तसेच दाखलपूर्व ३ हजार ९०२ प्रकरणे विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४२६ प्रलंबित प्रकरणे आणि ६ दाखलपूर्व प्रकरणे अशा एकूण ४३२ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या लोक अदालतीत तब्बल ३ कोटी ८६ लक्ष ९६ हजार ५१८ रुपयांच्या प्रकरणांवर तडजोडीने तोडगा काढण्यात आला.राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी वकील संघ तसेच जिल्हा पोलिस दलाचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे.