आर्णी तालुक्यातील दहावीचा निकाल ८८.२५ टक्के

    दिनांक :10-May-2026
Total Views |
आर्णी, 
10th class result in Arni taluka महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये आर्णी तालुक्यातील २३३२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ४१० प्राविण्यासह तर ७४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तृतीय श्रेणीत आले असून एकूण २०३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८८.२५ आहे.
 
 
sangarahit
(संग्रहित छायाचित्र ) 
 
 
तालुक्यातील महंत दत्तराम भारती विद्यालय आर्णी (९६.३३), श्री गुरुदेव विद्यामंदिर जवळा (८६.८१), शहिद भगतसिंग विद्यालय आर्णी (७६.७१), श्री एस एम डि भारती कन्या विद्यालय आर्णी (९३.४२), जानराव खडसे विद्यालय तळणी (९६.७७), देवराव पाटील विद्यालय आर्णी सदाशिव अनंत भागवत विद्यालय (७९.४५), सेवादास महाराज विद्यालय उमरीपठार (९८.१४), गुरूदेव टागोर विद्यालय अंजनखेड (८२.५०), मारोतराव पाटील राऊत विद्यालय कवठाबाजार (९०), माध्यमिक विद्यालय सुकळी (९१.४२), बाबा कंम्बलपोस विद्यालय आर्णी (९५.२३), इचोरा माध्यमिक विद्यालय इचोरा (८९.१३), स्व सजनीबाई आडे विद्यालय महाळूंगी (९३.३९), पांडुरंग मोरे विद्यालय उमरी कापेश्वर (८४.४४), शिक्षण प्रसारक विद्यालय बोरगाव (८८.६०), वसंतराव नाईक विद्यालय सावळी सदोबा (७७.५५), जिल्हा परिषद विद्यालय लोणबेहळ (६०.३७), संत तुकडोजी विद्यालय चिखली (६२.२६), राष्ट्रीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा लोणी (८१.३३), नेहरू विद्यालय केळझरा (९१.९३), जिल्हा परिषद विद्यालय लोणी (९१.८०), मंजी नाईक माध्यमिक विद्यालय आयता (७६.६६), श्री शिवाजीराव मोघे व्हिजेएनटि आश्रमशाळा हेटी (९५.२३), मातोश्री शांताबाई विद्यालय आर्णी (७७.१४), मातोश्री सुरताबाई चव्हाण विद्यालय दातोडी (९५.२३), स्व उत्तमराव देशमुख माध्यामिक विद्यालय कोपरा (७८.२६), शिवरामजी मोघे अनु माध्यमिक आश्रमशाळा आर्णी (९५.५५), स्व गणपतराव पाटिल आदिवासी आश्रम शाळा चिकणी (८७.८०), हाफिज बेग ऊर्दू हायस्कूल आर्णी (८४.२१), स्व ईश्वर देशमुख एनपी आदिवासी आश्रमशाळा कोपरा (४४), स्वामी विवेकानंद विद्यालय आर्णी गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कुल जवळा ८० टक्के निकाल लागला.
 
 
10th class result in Arni taluka  शहरातील श्री महंत दत्तराम भारती विद्यालय गांधीनगर आर्णी, सनराईज नर्सरी आणि कॉन्व्हेंट आर्णी, स्व उत्तमराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कुल आर्णी, संत सेवालाल महाराज विद्यालय सावळीसदोबा, विद्यावर्धिनी स्कूल लोणबेहळ, नारायण लीला इंग्लिश मीडियम स्कूल आर्णी, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल आर्णी, एससी निवासी शाळा भंडारी या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी खालावली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. मुलांची माघारण्याची कारणे शोधणेसुद्धा जिकीरीचे झाले आहे.