पेशावर
police station in Pakistan पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बन्नू जिल्ह्यातील फतेहखेल परिसरातील पोलीस ठाण्याला लक्ष्य करत अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांनी वेळेत कारवाई करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण चकमक उडाली. या हल्ल्यात किमान तीन पोलीस जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आसपासच्या घरांनाही मोठे नुकसान पोहोचले. परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. police station in Pakistan स्फोटानंतर अतिरेक्यांनी पोलीस ठाण्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही जोरदार प्रतिकार करत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेवर खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सोहेल आफ्रिदी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करत मृत पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादाविरोधातील लढा हा केवळ एका प्रांताचा नसून संपूर्ण देशाचा असल्याचे त्यांनी म्हटले. police station in Pakistan तसेच चुकीच्या धोरणांमुळे देशाला असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलले गेले असल्याची टीकाही त्यांनी केली. अफगाणिस्तान सीमेलगतच्या या भागात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः सुरक्षा दलांवर होणारे वाढते हल्ले पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.