नागपूर,
AccuSat Nagpur ॲक्युसॅट नागपूर विभागीय कार्यकारिणीची सभा नुकतीच पार पडली. सभेत २००६ नंतर निवृत्त झालेल्या प्राध्यापक व प्राचार्यांना अतिरिक्त एक इन्क्रिमेंट मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शेवटचे इन्क्रिमेंट घेतल्यानंतर सहा महिने सेवा पूर्ण झालेल्या निवृत्त शिक्षकांनी ॲक्युसॅटकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे होते. यावेळी प्राचार्य प्रभुजी देशपांडे, डॉ. अशोक काळे, डॉ. नरेंद्र दीक्षित, डॉ. पांडुरंग बाळबुधे, डॉ. रत्नाकर लांजेवार आदी उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी डॉ.पुष्पा तायडे यांनी स्वागत केले तर शेवटी डॉ. रत्नाकर लांजेवार यांनी आभार मानले.
सौजन्य : अशोक माटे,संपर्क मित्र