बल्लारशा-मुंबई ताडोबा एक्सप्रेसला हिरवा कंदील

    दिनांक :10-May-2026
Total Views |
*केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद
*आ. मुनगंटीवार यांची चंद्रपूर-पुणे रेल्वेचीही मागणी

चंद्रपूर, 
Ballarat-Mumbai Tadoba Express राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेत, चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत बल्लारशा ते मुंबई थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या गाडीला ताडोबा एक्सप्रेस असे नाव देण्याचा प्रस्तावही आ. मुनगंटीवार यांनी मांडला. 
 

ASHVIN 
 
या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी प्रारंभी आठवड्यातून एक दिवस ही रेल्वे सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढे सेवा वाढविण्याबाबतही अनुकूल संकेत दिले आहेत. दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, झेडआरयुसीसीचे सदस्य अजय दुबे, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
Ballarat-Mumbai Tadoba Express  बैठकीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल बल्लारशा एक्सप्रेस गाडी फेर्‍या वाढविणे, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर अनियमित व फार उशिराने चालणार्‍या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकाचे पालन होण्यावर भर देण्याबाबत, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर सुपर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत, बल्लारपूर आणि चंद्रपूर परिसरातील विविध प्रलंबित रेल्वे विकासकामांवर चर्चा करण्यात आली. बल्लारपूर आणि चंद्रपूर येथे लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती करण्यात आली. चंद्रपूर येथील श्री. महाकाली मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने नांदुरा येथे सुपरफास्ट गाड्यांचा थांबा होणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. नांदुरा रेल्वे स्थानकावर हिसार सुपरफास्ट एक्सप्रेस, ओखा-दरभंगा सुपरफास्ट एक्सप्रेस, जोधपूर-बेंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस आणि पुणे-काशी एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. यावर संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक निर्देश देत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानक विकसित होणार
अमृत भारत स्टेशन योजन ेअंतर्गत बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. या कामांना मंजुरी मिळूनही अपेक्षित गतीने कामे होत नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संबंधित अधिकार्‍यांना कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.