म.द.भारती माध्य. विद्यालयाची यशाची परंपरा कायम

    दिनांक :10-May-2026
Total Views |
तालुक्यातून सायली विनोद रणनवरे ९६ टक्क्यांसह प्रथम

आर्णी : दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित Bharati Madhya. Vidyalaya श्री म. द. भारती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, आर्णी (मु‘य शाखा) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या सत्र २०२५-२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल ९६.३३ टक्के लागला. आर्णी तालुक्यातुन व विद्यालयातुन प्रथम क‘मांक येण्याचा मान सायली विनोद रणनवरे या विद्यार्थिनीने ९६ टक्के घेऊन अनुक‘मे द्वितीय तृप्ती दत्ता शेगर ९२.२०%, तृतीय साफीया जावेद सोळंकी ९०.६० टक्के घेउन घवघवीत यश संपादन केले.
 
 
bharati
 
Bharati Madhya. Vidyalaya तालुक्यातील मातृशाळा असलेली ही शिक्षणसंस्था तथा माजी संस्थाध्यक्ष कै. डॉ. संजय भारती यांच्या प्रेरणेने संस्थेने ९४ वर्षांच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. आर्णी तालुक्यात श्री म.द.भारती माध्य. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. किरण भारती, सचिव अ‍ॅड. सिध्दार्थ भारती, उपाध्यक्ष समृद्ध भारती, कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती, संचालक अश्विनी भारती, प्राचार्य जगताप व उपमु‘याध्यापक नन्नावरे, पर्यवेक्षक वानखडे, नामदेववार, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले व उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.