बोर व्याघ्रत ६४ बिबट

२०२४-२५ च्या गणनेच्या चौथ्या टप्प्याचा अहवाल जाहीर

    दिनांक :10-May-2026
Total Views |
वर्धा,
Boar tiger बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात सन २०२४-२५ मध्ये वन्यप्राण्यांच्या गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला. या वन्यजीव गणनेचा अंतिम अहवाल वाईल्ड लाईफ इन्स्ट्रीट्यूशन देहरादूनच्या तज्ज्ञांनी जाहीर केला असून अहवालानुसार बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कोअर क्षेत्रात तब्बल ६४ बिबट्यांचा अधिवास असल्याचे नमुद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच अहवालात बोर व्याघ्र प्रकल्पात १४ प्रौढ वाघ असल्याचे नमुद आहे.
 
 
Boar tiger
 
१३ हजार ८०० हेटरचे कोअर क्षेत्र तर ६७ हजार ८१४.४६ हेटरचे बफर क्षेत्र असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची संख्या किती याची माहिती घेण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात सन २०२४-२५ मध्ये तब्बल ३९६ ट्रॅप कॅमेर्‍यांचा वापर करून वन्यजीव गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला. Boar tiger याच ट्रॅप कॅमेरातील चित्रिकरणाचे वाईल्ड लाईफ इन्स्ट्रिट्यूशनच्या तज्ज्ञांनी निरीक्षण केले असता बोर व्याघ्र प्रकल्पात १४ प्रौढ वाघ आणि ६४ बिबट असल्याचे पुढे आले आहे.
 
 
वाईल्ड लाईफ इन्स्ट्रिट्यूशनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, बोर व्याघ्र प्रकल्पात १४ प्रौढ वाघ आहेत. शिवाय ६४ प्रौढ बिबट्यांचा अधिवास आहे. Boar tiger या ६४ बिबट्यांमध्ये २७ नर तर ३४ मादी आणि तीन सेस अनआयडेंटीफाईड बिबट्यांचा समावेश आहे. बोर व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांसह बिबट्यांच्या संवर्धनासाठीही उपयुक्त ठरत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
 
 
९ बिबट्यांचा कोअर, बफर मध्ये मुव्हमेंट
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात ६४ बिबट्यांचा अधिवास आहे. त्यापैकी २८ बिबट कोअर तर २७ बिबट्यांचा बफर क्षेत्रात अधिवास असल्याचे तसेच ९ बिबट्यांची Boar tiger कोअर आणि बफर क्षेत्रात मुव्हमेंट राहत असल्याचे गणनेत पुढे आले असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.