हिंगणघाट,
Cheque bounce case येथील व्यावसायिक विजय चंदाणी यांना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी गवई यांनी धनादेश अनादरीत प्रकरणी १० महिन्याचा कारावास तसेच ३ लाख ८५ हजार रुपये देण्याचा आदेश पारित केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र मोटवानी यांनी विजय चंदानी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मोटवानी यांना २ लाख ५० हजार रुपयाची मदत मागितली. मोटवानी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या मार्फत सदर रक्कम चंदानी यांना दिली.
Cheque bounce case त्यानंतर मोटवानी यांनी चंदानी यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत तकादा लावल्याने चंदानी यांनी १२ फेब्रुवारी २०१९ या तारखेचा धनादेश दिला. बँकेत तो सादर केल्यावर खात्यात अपुरी रक्कम असल्याच्या कारणावरून धनादेश परत आला. या प्रकरणी जितेंद्र मोटवानी यांनी न्यायालयात दाद मागितली. दोन्ही बाजूनी साक्ष पुरावे तपासल्या नंतर न्यायाधीश गवई यांनी विजय चंदानी याला १० महिने कारावास अशी शिक्षा ठोठावत मोटवानी यांना व्याजासह ३ लाख ८५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलेला आहे.