उर्विल पटेलच्या वादळाने लखनौला झोडपले, CSKने ५ गडी राखून चिरडले!

    दिनांक :10-May-2026
Total Views |
चेन्नई,
CSK vs LSG : आयपीएल २०२६ च्या ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात उर्विल पटेलने वादळी खेळी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने १३ चेंडूंमध्ये हा पराक्रम करून जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी केली.
 
 
 
CSK
 
 
रविवारी दुपारी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २०३ धावा केल्या आणि २०४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला एकही बळी न देता, ४ चेंडू शिल्लक असताना ५ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. उर्विल पटेलने आजच्या सामन्यात इतिहास रचला. हा सामना स्मरणात राहील.