देवराव पाटील विद्यालयाचा निकाल ९५.१६ टक्के

    दिनांक :10-May-2026
Total Views |
अमरदीप वानखडे ९४.४० टक्के घेऊन प्रथम
आर्णी :
Devrao Patil Vidyalaya देवराव पाटील विद्यालयाचा निकाल ९५.१६ टक्के लागला असून अमरदीप नारायण वानखडे ९४.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आला. यश चंद्रमणी कांबळे (९२, द्वितीय), भाविका गणेश मसराम (९१.८० तृतीय), शंतनू गोपाल तांगडे ९१.८० हे विद्यार्थी प्रावीण्यासह तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 
 
Devrao
 
विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उत्तम निकालाची परंपरा कायम राखली असून त्यांच्यावर वर्षांव होत आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष मनीष पाटील, उपाध्यक्ष सुशीला पाटील, व्यवस्थापक लक्ष्मण पवार, प्राचार्य व मार्गदर्शन झिबल उदार व शिक्षक व कर्मचार्‍यांना दिले आहे.
 
 
वणी लायन्स इंग्लिश मिडीयम दहावीचा निकाल १०० टक्के
वणी, 
वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा एस. एस. सी. (फेब‘ुवारी) २०२६ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखत घवघवीत व कौतुकास्पद यश संपादन केले. यात अनिकेत मधुकर तुराणकर या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून गुणानुक‘मे अव्वल क‘मांक तर तालुक्यातून दुसरा येण्याचा बहुमान पटकावला. वैष्णवी नितीन भालेराव हिने (९६.२०) टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर आरूष सुधीर खराटे याने ९६.०० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क‘मांक पटकावला.
 
 
एकूण १६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी ७० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून यापैकी १४ ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, शाळेचे संचालक शमिम अहेमद, नरेंद्र बरडीया, चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के.आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, वर्ग शिक्षक, शिक्षक व कर्मचार्‍यांनी कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूलच्या
उत्कृष्ट निकालाची परंपरा २३ वर्षांपासून कायम
पुसद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा पुणेमार्फत २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत पुसद येथील हजरत उमर फारूक (रजि) उर्दू हायस्कूल निकालाची परंपरा कायम ठेवत यवतमाळ जिल्ह्यातील एक नामांकित शाळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शाळेमधून एकूण १९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ६० विद्यार्थिनी विशेष प्रावीण्य गुण प्राप्त केले. ७४ विद्यार्थी प्रथम ४७ द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले. यात इफरा तहेरीम गुलाम नबी शेख ९४.००, मारिया ऐमन अन्सार अहमद ९३.४०, अफिरा फातेमा लाईक अहमद ९३.००, खुतेजा अहेवार वाहिद मिर्झा ९३.००, आसमीर खान सलीम खान ९१.००, उम्मे हबीबाह अब्दुल हमीद ९१.००, फातेमा तबसूम जमील शाह ९०.२०, फौझान अली इम‘ान अली ८९.४०, मर्जूका मुदस्सीर ८९.००, जुबिया नाज सय्यद इर्शाद ८८.२०, हस्सान ताहमी रहमतु‘ा खान ८८.००, सना फिरदोस एजाजखान ८७.४०, सनाया सदीम नासिर अहमद ८७.४०, फरिसा खानम मो. शम्स नवेद ८६.४०, नौशीन खानम नसरु‘ाह खान ८६.००, मारिया जावेद मोहंमद ८६.०० गुण प्राप्त करून पुसद तालुक्यात शाळेचे नाव उज्ज्वल केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे संचालक तसेच मु‘याध्यापक (मो. वकील माध्य व उच्च माध्य. विद्यालय, याह्या खान प्राथ.व उच्च प्राथ शाळा) वर्ग शिक्षक अब्दुल करीम, फहिमोद्दीन, मो. जुनेद व सर्व शिक्षकवृंदांनी केले.