दिग्रस,
तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांच्या Digras Taluka Journalist Association दिग्रस तालुका पत्रकार संघटनेकडून येथील शहीद स्मारक चौकात आठवडी बाजारातील नागरिकांसाठी पाणपोई उपलब्ध करून दिली. शहरातील मध्यवर्ती ठिकाण तसेच अत्यंत वर्दळीच्या बाजारपेठेतील शहीद स्मारक चौकात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. या तापत्या उन्हात वेळोवेळी तहान लागणे ही गरज ओळखून पत्रकार संघटनेतर्फे ताजे व थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Digras Taluka Journalist Association याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, राष्ट्रीय कबड्डीपटू उद्धव अंबुरे व श्रीचंद राठोड, गोपाल शाह, संतोष शुक्ला, संघटनेचे अध्यक्ष पीपी पप्पूवाले, सचिव यशवंत सुर्वे, फारुक अहेमद, आनंद आडे, अब्दुल रफिक शेख, अनिल राठोड, नसीम बेगसह संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .