वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशीची घटना

    दिनांक :10-May-2026
Total Views |
-तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला
 
 
अर्जुनी मोरगाव,
Elderly woman killed तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने झडप घालून ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी १० मे रोजी सकाळी उघडकीस आली. सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे.
 
 
woman killed
 
मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे (६५) रा. वडेगाव बंध्या असे आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र गोठणगाव अंतर्गत वनक्षेत्र केशोरी येथील नियतक्षेत्र वडेगाव बंध्या, कक्ष क्रमांक २८२ मध्ये त्या आपल्या सुनेसह तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. Elderly woman killed यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, बोंडगाव-सुरबन परिसरात काल, शनिवारी ९ मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यात आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात भयाचे सावट पसरले आहे. परिसरात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, वन्यप्राणी गावालगत येऊन कोंबड्या, शेळ्या तसेच लहान मुलांवरही हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
 
 
यापूर्वी एका चिमुकल्याचा जीवही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गेला होता. आता सलग दोन दिवस झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मृत कौशल्या रहाटे या स्थानिक अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. Elderly woman killed त्या नुकत्याच १ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.