लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने एल्विश यादवला धमकी

    दिनांक :10-May-2026
Total Views |
गुरुग्राम,
Elvish Yadav threatened लोकप्रिय समाजमाध्यम व्यक्तिमत्त्व आणि ‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा गंभीर कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर हरियाणातील गुरुग्राम येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरू झाला आहे.
 
Elvish Yadav threatened
 
मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादव आणि त्यांच्या वडिलांच्या दूरध्वनीवर परदेशी क्रमांकावरून संदेश पाठवण्यात आला. या संदेशात दोन दिवसांच्या आत दहा कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. Elvish Yadav threatened सुरुवातीला दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानंतर थेट संदेश पाठवून खंडणीची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
तक्रारीनुसार, संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले. या धमकीनंतर एल्विश यादव यांनी गुरुग्राममधील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. Elvish Yadav threatened या घटनेमुळे एल्विश यादव यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही त्यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. काही समाजकंटकांनी दुचाकींवर येत त्यांच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या पोलीस धमकीचा स्रोत, वापरण्यात आलेले क्रमांक आणि संबंधित व्यक्तींचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे समाजमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.