’त्या’ विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करू नका

    दिनांक :10-May-2026
Total Views |
- हायकाेर्टाचे सीईटी, आयुर्वेदीक काॅलेजला आदेश
- 30 जूनपर्यंत मागितले प्रतिज्ञापत्र

अनिल कांबळे
नागपूर, 
Entry cancellation case अनुसूचित जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असल्यामुळे एका विद्यार्थिनीला बीएएमएस पदवीकरिता प्रवेश देण्यात आला हाेता. मात्र, ती विद्यार्थिनी तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र सादर करु शकली नाही, त्यामुळे तिचा प्रवेश महाविद्यालयाकडून रद्द करण्यात आला हाेता. विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्या विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द न करण्याचे आदेश महाविद्यालय आणि सीईटी सेलला दिले.
 
 
add
 
Entry cancellation case  रिध्दी चंद्रशेखर वाकडे (रा. ओंमकारनगर, नागपूर), असे याचिकाकर्त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या सिरसी येथील भाेजराज भाेंडेकर आयुर्वेदिक काॅलेजमध्ये बीएएमएस प्रथम वर्षात ती शिक्षण घेत आहे. रिध्दी हिचा माना अनुसूचित जमातीचा प्रस्ताव ऑक्टाेबर 2023 पासून नागपूर अनुसूचित जात पडताळणी समितीकडे प्रलंबित हाेता. दरम्यान रिध्दी यांचा आयुर्वेदिक काॅलेजमध्ये प्रवेश हा अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर झाला हाेता. परंतु, ेबु्रवारी 2026 मध्ये अनुसूचित जात पडताळणी समितीने त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवित प्रमाणपत्र जप्त केले. त्यामुळे रिध्दी यांनी अ‍ॅड. रामटेके यांच्यार्माफत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सुनावणीअंती याचिकाकर्ती रिध्दी यांचा जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव अवैध ठरविण्याचा कारणावरून त्यांचा प्रवेश रद्द करू नका, असे आदेश दिलेत. तसेच न्यायालयाने सीईटी सेल व आयुर्वेदिक काॅलेजला नाेटीस बजावून येत्या 30 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.