अखेर थलपती विजय बनले मुख्यमंत्री

    दिनांक :10-May-2026
Total Views |
चेन्नई,
Chief Minister तामिळनाडूच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड घडली असून अभिनेते ते राजकारणी असा प्रवास करणारे सी. जोसेफ विजय यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांनी तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ स्वीकारली. त्यांच्या शपथविधीनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे.
 
Chief Minister
 
सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय यांनी काही दिवसांपासून विविध पक्षांशी चर्चा सुरू ठेवली होती. अखेर विविध मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांना आवश्यक संख्याबळ मिळाले. टीव्हीकेकडे स्वतःचे मोठे संख्याबळ असतानाच काँग्रेस, डावे पक्ष तसेच इतर काही लहान पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला. Chief Minister या सर्व आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे घेऊन विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली होती.
 
राज्यपालांनी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विजय यांना सरकार स्थापनेसाठी अधिकृत निमंत्रण दिले. Chief Ministerहे निमंत्रण मिळताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. विजय यांच्या राजकीय प्रवासातील हा सर्वात मोठा टप्पा मानला जात असून चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आता राज्यकारभाराची धुरा सांभाळणार आहे.
 
मात्र मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही दिवस राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू होत्या. सुरुवातीला आवश्यक बहुमताचा आकडा पूर्ण होत नसल्याने त्यांना पुन्हा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. Chief Minister विविध पक्षांशी सातत्याने चर्चा आणि बैठका घेतल्यानंतर अखेर त्यांना स्पष्ट बहुमताचा पाठिंबा मिळाला आणि मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण घडामोडींमुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचे मानले जात आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार राज्याच्या विकासासाठी कोणती दिशा ठरवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.