यवतमाळ,
Giants School Results जायन्ट्स इंग्लिश मिडियम स्कूलने महाराष्ट्र माध्यमिक शालांत परीक्षा 2025-26 मध्ये 100 टक्केनिकाल देत 15 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कायम राखत घावघवीत यश संपादन केले. यावर्षी दहावीकरिता 88 विद्यार्थी प्रविष्ट झाले. 13 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा, 25 विद्यार्थी 81 टक्क्यांपेक्षा आणि 17 विद्यार्थी 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
Giants School Results शाळेतून पहिला येण्याचा मान अविनाश किसन ढोबळे 96 टक्के आणि प्रियांशू अरविंद देवतळे 95 टक्के व आलेख पुरुषोत्तम मंडलिक 94 टक्केयांना दुसरा व तिसरा येण्याचा मान मिळाला. संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन, सचिव रमेश छेडा, उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, गुरुबक्ष आहुजा, कोषाध्यक्ष सुहास चिद्दरवार, सल्लागार सीए प्रकाश चोपडा, डॉ. सुरेंद्र पदमावार प्रशासकीय अधिकारी राजेश घावडे, मुख्याध्यापक योगेश चौहान, शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.