दोन महासत्तांची ‘ग्रेट-भेट’

ट्रम्प-जिनपिंग पुढील आठवड्यात चर्चा

    दिनांक :10-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन
Trump-Jinping अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग पुढील आठवड्यात बीजिंगमध्ये भेटणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या शिखर बैठकीत जगातील दोन महासत्तांमधील स्पर्धेच्या पुढील टप्प्याला दिशा मिळेल, असे बोलले जात आहे.
 
trump jinping 
Trump-Jinping येत्या गुरुवारी ही भेट होणार असून या बैठकीत ट्रम्प आणि जिनपिंग इराणमधील युद्ध, व्यापार, तैवान आणि इतर वादग्रस्त मुद्यांवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांची शेवटची भेट ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियात झाली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी आपापसातील तीव्र व्यापारयुद्ध थांबवण्याचे मान्य केले होते. Trump-Jinping व्यापारयुद्धात अमेरिकेने चिनी वस्तूंवर तीन अंकी दराने शुल्क लादले होते तर बीजिंगने दुर्मिळ खनिजांच्या जागतिक पुरवठ्यावर निर्बंध आणण्याचा इशारा दिला होता. या पृष्ठभूमीवर येत्या आठवड्यातील बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.