* जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
वर्धा,
खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकरी हंगामासाठी पीककर्ज घेतो. पीक कर्जासाठी शाखा बँकेत अर्ज केल्यावर तो अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे मंजूर होण्यास वेळ जातो. परिणामी, पेरणीला सुरुवात होऊन जाते. यासाठी बँकांनी समन्वयाची भूमिका बजावून पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मंजूर करावी. पीक कर्जाचे १०० टक्के वितरण करावे, अशा सूचना Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत त्यांनी सूचना केल्या. यावेळी खासदार अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर आदी उपस्थित होते. यावर्षी देण्यात आलेले पीक कर्जाचे १०० टके लक्षांक पूर्ण होईल, असे बँकांनी नियोजन करावे. प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या सौरपंपामध्ये शेतकर्यांना येणार्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने जिल्हा व तालुका तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. पूर्वी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत केवळ शेतकर्यांना मदत देण्यात येत होती. शासनाने यामध्ये बदल करुन शेतमजुरांचा समावेश केला आहे. याची ग्रामीण भागात कृषी विभागांनी जनजागृती करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही ना. डॉ. भोयर यांनी दिल्या.
एल निनोच्या पृष्ठभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुत शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावी. शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी गावस्तरावर बैठका घेऊन शेतीचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशाही सूचना यावेळी ना. डॉ. भोयर यांनी दिल्या.
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar यावर्षी जिल्ह्यात धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ, सूर्यफुल, भुईमुग, कापूस या पिकासाठी ४ लाख १८ हजार ९७५ हेटर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून ८७ हजार १८४ विंटल बियाणे मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ लाख १७ हजार १०० मेट्रीक टन खताची मागणी असून एप्रिल अखेरपर्यंत ५९ हजार १८९ मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे, असे अरविंद उपरीकर यांनी सांगितले. यावेळी खा. अमर काळे यांनी खत वितरीत करण्यासाठी वर्धा व हिंगणघाट रॅक पॉईट असल्याने काही तालुयात खत पुरवठ्याला विलंब होतो, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आ. समिर कुणावार यांनी शेतकर्यांना माती परीक्षण यावर मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करावे, असे सांगितले. आ. राजेश बकाने यांनी एलनिनोच्या पृष्ठभूमीवर विद्युत वितरण कंपनीला नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.