वर्धा :
आर्वी मार्गावरील Hotel Shivam हॉटेल शिवम येथे छापा टाकूण पोलिसांनी दारूसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार ९ रोजी करण्यात आली. हॉटेल शिवमचा मालक नितीन पडोळे हा आपल्या हॉटेलमधून देशी-विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी Hotel Shivam हॉटेलमध्ये छापा टाकूण पाहणी केली असता ग्राहक दारू पिताना मिळून आले. या ग्राहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नोकर नितेश शिरभाते (२१) रा. तिगाव, कुंदन करणे (५९) रा. पवनार, दर्शन ठोके (३०) रा. केळकरवाडी, रोहित सावरे (३०) रा. सेवाग्राम, मनोज सयाम (४६) रा. त्रिमूर्तीनगर हे उपस्थित होते. हॉटेलचा मॅनेजर नितेश शिरभाते याच्या समक्ष सदर हॉटेलची झडती घेतली असता दारू, फ्रिजर, २८ लोखंडी चेअर, टेबल, असा ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल मालक नितीन पडोळे यांच्या विरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.