शेतकरी संघटनेचे १२ मे रोजी अभिनव आंदोलन

    दिनांक :10-May-2026
Total Views |
एचटीबीटी कापूस बियाणे चाचणीसाठी देणार

यवतमाळ, 
HTBT cotton seeds अप्रमाणित एचटीबीटी कापूस बियाणे दिग‘सच्या क्षेत्रीय चाचणीसाठी देण्याचे अभिनव आंदोलन शेतकरी संघटना मंगळवार, १२ मे रोजी दिग‘स तालुक्यातील तुपटाकळी येथे करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या विज्ञान व तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी दिली. या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते दीपक आनंदवार यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. या बैठकीला तुपटाकळी, चिचपात्र, वसंतनगर, बेलोरा, वरंदळी येथील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते.
 
 
damale
 
शेतकर्‍यांना अप्रमाणित एचटीबीटी कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद किंवा गव्हाचे खुले किंवा पाकिटातील बियाणे पेरण्याचा आणि देशातून कुठूनही व कोणाकडूनही खरेदी व वाहतूक करण्याचा हक्क आहे, असे शेतकरी संघटनेचे मत आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांचा पीक उत्पादन खर्च कमी करण्याचा मूलभूत अधिकार अप्रमाणित कापूस बियाणे जप्त करून नाकारत आहे. या पार्श्वभूमीवर एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानाचे महत्व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकरी संघटना हे अभिनव आंदोलन करणार आहे.
 
 
 
HTBT cotton seeds  यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांना अप्रमाणित ‘एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे घेऊन दिग‘सला चला’, असे आवाहन केले आहे. गेली १५ वर्षे दिग‘स तालुक्यात शेतकरी अप्रमाणित एचटीबीटी बियाणे लागवड करत आहेत आणि त्यांना दर्जेदार कापसाचे अप्रमाणित एचटीबीटी बियाणे घरपोच मिळत आहे, हे या ठिकाणी उल्लेखनीय. या अप्रमाणित एचटीबीटी कापसावर स्टोम्प, क्लास, मॅक्सकॉट, हिटविड, टरगा सुपर, स्वीप, पॉवर, हिटविड मॅक्स व ग्लायफोसेट अशी तणनाशके फवारली तरी कापसाचे नुकसान होत नाही. तसेच त्यावर २-४-डी डायमिथिल अमाईन तणनाशकाचे हवेतून कण पडले तरी विपरित परिणाम होत नाही आणि त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान टळते याकडे शेतकरी संघटनेने लक्ष वेधले आहे.
 
 
या आंदोलन दरम्यान बियाण्यांसोबतच शेतकरी संघटना दिग‘स तालुक्यातील खरीप हंगाम २०२५-२६ मधील अप्रमाणित एचटीबीटी कापूस उत्पादक शेतकर्‍यांची एकरी उत्पादकता व तण नियंत्रण खर्च यशोगाथा दिग‘स तहसीलदारांच्या सुपूर्द करणार आहे. तसेच व राज्य सरकारने महसूल तूट कमी करण्यसाठी एचटीबीटी कापसाला अनुमती द्यावी, शेतकरी त्यासाठी कृषी केंद्रांतून अधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे खरेदीची पक्की पावती घेतील, असेही अभिवचन शेतकरी संघटनेने या निमित्ताने दिले आहे.