नेपाळमध्ये भारतीयांना ओळखपत्राशिवाय प्रवेश नाहीच!

नव्या सरकारचा कडक आदेश

    दिनांक :10-May-2026
Total Views |
काठमांडू
Nepal news नेपाळमधील बालेन सरकारने भारतीय नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. नेपाळमध्ये जाणाèया भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच नेपाळमधून भारतात येणाèयांनाही आपले परिचय पत्र दाखवावे लागणार आहे.
 
nepal balen 
Nepal news आधार कार्ड किंवा सरकारने जारी केलेले इतर कोणतेही वैध ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल. नेपाळ प्रशासनाने शनिवारपासून या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर जोगबनी येथील भारत-नेपाळ सीमेवर दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. ओळखपत्रांच्या सखोल तपासणीमुळे सीमेवर वाहनांचया आणि Nepal news पादचाऱ्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोलकाता येथून येणारी रेल्वेगाडी जोगबनी स्थानकावर पोहोचताच मोठ्या संख्येने प्रवासी नेपाळला जाण्यासाठी सीमेवर पोहोचले. मात्र, नेपाळ पोलिसांकडून ओळखपत्र तपासल्यानंतरच लोकांना प्रवेश दिला जात होता. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्र नव्हते, त्यांना सीमेवरूनच परत पाठवण्यात आले.