माय-माऊलींच्या चेहर्‍यावर फुलले आनंदाचे हास्य

    दिनांक :10-May-2026
Total Views |
जागतिक मातृदिनानिमित्त वृद्ध ज्येष्ठ मातांचा सन्मान
 
वाशीम, 
International Mother's Day जागतिक मातृदिनानिमित्त १० मे रोजी वाशीम येथील ज्येष्ठ माताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मयुर गणेश राऊत यांच्या पुढाकाराने श्री साई वृद्धाश्रम येथे आयोजित विशेष आईचा सत्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
 
 
Mother
 
कार्यक्रमात वृद्धाश्रमातील माय-माऊलींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक माय-माऊलींच्या चेहर्‍यावर आनंदाचे हास्य खुलले, तर काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. संपूर्ण परिसरात प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्र दरम्यान मयुर राऊत यांनी ज्येष्ठ मातासोबत संवाद साधत त्यांच्या आयुष्यातील अनुभव जाणून घेतले. तसेच फळे, मिठाई व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मातृसेवा हीच ईश्वरसेवा तसेच प्रत्येक स्त्रीकडे माता समान पाहावे हा संदेश देत समाजातील ज्येष्ठ मातांप्रती आदर, प्रेम आणि संवेदनशीलता जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
 
International Mother's Day  कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ज्येष्ठ मातांनी आयोजकांना मनापासून आशीर्वाद देत समाधान व्यक्त केले. अनेक मातांनी आपल्या भावना व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे आपुलकीची जाणीव होत असल्याचे सांगितले. माय-माऊलींच्या चेहर्‍यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साई वृद्धाश्रमाच्या संचालिका मंदा आखाडे यांच्यासह अविनाश राऊत व दिनेश भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.