मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर,
Kalyaneshwar Temple सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व,अटूट आस्था की गौरव गाथा’ या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ११ मे रोजी सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
Kalyaneshwar Temple याप्रसंगी भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्र अभिषेक आदींचा समावेश आहे. कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे, विशेष पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, खासदार माया ईवनाते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, दर्शनी धवड, उमा देशमुख, गणेश चर्लेवार, सुधीर राऊत, पियुष आंबुलकर आदींची उपस्थिती राहणार आहे.