पांढरकवडाकरांच्या शिस्तीचा ‘पंच’

    दिनांक :10-May-2026
Total Views |
कराटे बेल्ट परीक्षेत 22 विद्यार्थ्यांची भरारी

पांढरकवडा, 
Karate belt exam जपान शोतोकान कराटे-डो कानिन-जुकू ऑर्गनायझेशन इंडिया व यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने पांढरकवडा येथे कराटे प्रशिक्षण व बेल्ट ग्रेडेशन परीक्षा पार पडली. 18 एप्रिल रोजी जंगोदाई पेनठाणा टेकडी येथे आयोजित या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपले कौशल्य सिद्ध केले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांनी नवनवीन बेल्ट प्राप्त करत आपल्या मेहनतीचे फळ मिळवले.
 
 
karate
 
या परीक्षेसाठी जपान शोतोकान कराटे-डो कानिन-जुकू ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर आणि जागतिक कराटे महासंघाचे ए ग्रेड पंच परमजित सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेचे मुख्य निरीक्षक म्हणून कराटे क्षेत्रातील पहिली डॉक्टरेट प्राप्त केलेले, 5 व्या डॅनचे ब्लॅक बेल्टधारक डॉ. आनंद भुसारी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे अवलोकन केले.
याप्रसंगी बोलताना कराटे प्रशिक्षक सेन्साई योगेश पडोळे म्हणाले, कराटे म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही, तर ती शिस्त आणि संयमाची साधना आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासोबतच त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव मरापे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
 
Karate belt exam  या परीक्षेत विविध गटांतून विद्यार्थी यशस्वी झाले. यामध्ये येलो बेल्टसाठी पद्मजा जगन्नाथ साबळे, मंजिरी योगेश जगताप, नव्या संदीप मोतिकार, परमवीर अश्विनकुमार पाटील, रुद्र प्रशांत येडशीकर आणि पार्थ भारत निपुणे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ब्ल्यु बेल्टसाठी नव्या मोतिकार, ईश्वरी रामकृष्ण गेडाम, मानसी दीपक चौधरी, मनस्वी मुकेश माथुर, पूर्वी विलास राठोड, मार्टिन मुकेश माथुर, साईप्रसाद हितेश नागभिडकर, अंश योगेश पडोळे आणि सौरव रवींद्र सुकेवार यांनी यश संपादन केले. तसेच ग्रीन बेल्टसाठी मनस्वी माथुर, क्रितीका शशिकांत वानखडे आणि मानसी चौधरी हे यशस्वी झाले असून, क्रितीका वानखडे हिने परपल बेल्ट संपादन केला आहे. ब्राऊन बेल्ट-3 साठी अर्हत राहुल मेश्राम, अथांग दीपक पडोळे, पृथ्वीराज संदीप संदलवार, वेदांत ज्ञानेश्वर सोयाम, ओम प्रवीण कुमरे, सानिध्य मंगेश वातीले, मुग्धा संदीप वटे, खुशी सोनुदीप सिन्हा आणि रुद्र प्रदीप सोमनकार यांनी बाजी मारली. याशिवाय, ब्राऊन बेल्ट-2 गटात छनछन योगेश पडोळे आणि रुद्र सोमनकार यांनी यश मिळवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन सेन्साई योगेश पडोळे आणि हितेश नागभीडकर यांनी केले. आभार सेन्साई हितेश नागभीडकर यांनी मानले.