समुद्रपूर,
karate competition शिवणफळ येथील रहिवासी पीयूष गारघाटे याने नाशिक येथे कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर कराटे अजिंयपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या यशामुळे शिवणफळ गावासह समुद्रपूर तालुयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
karate competition ही स्पर्धा ५ टक्के आरक्षण अंतर्गत घेण्यात आली होती. राज्यभरातून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये पीयूषने जिद्दीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पीयूष गारघाटे हा गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालय येथे दहावीत शिक्षण घेत आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. त्याच्या या यशाबद्दल मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, प्रशासक राजू नौकरकर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य फकिरा खडसे, जि.प.चे सदस्य डॉ महैश गौर, शेख इस्राईल, मंगेश गिरडे, विजय तडस, प्रा. मेघश्याम ढाकरे आदींनी अभिनंदन केले.