जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे आवाहन
यवतमाळ,
Maha DBT Scheme कृषी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान 2026-27 अंतर्गत विविध घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकèयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, उपलब्ध घटक : प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके, समाविष्ट पिके : गळीतधान्य, अन्नधान्य आणि कडधान्य, अर्जाची पद्धत : महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
Maha DBT Scheme खरीप हंगामात तेलबिया व कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्यासाठी शेतकèयांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महाडीबीटी प्रणालीवर यासाठीची अर्जाची खिडकी आता खुली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या पिकांसाठी लक्षांक देण्यात आले आहेत, त्या पिकांसाठी जास्तीत जास्त शेतकèयांनी महाडीबीटी पोर्टलवर आपल्या अर्जाची नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी शेतकèयांनी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.