यवतमाळ :
Mahila Vidyalaya माध्यमिक शालांत प्रमाणपत्र निकालात शिशुविहार मंडळांतर्गत, महिला विद्यालयाने १०० टक्के निकाल देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. अमृता अनिल येळणे हिने ९२.४० टक्के मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळावला.
Mahila Vidyalaya मृणाली किरण शेंडे हिने ९१ टक्के गुण मिळवत द्वितीय क‘मांक, तर अनुजा पंजाब धनवरने ८८.४० गुण मिळवून तृतीय क‘मांक पटकावला. या परीक्षेत १३२ ३६ विद्यार्थिनींनी प्रावीण्य श्रेणी, ६३ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी, ३१ विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणी तर २ विद्यार्थिनींनी पास श्रेणी प्राप्त केली. विद्यार्थिनींच्या यशाचे पदाधिकारी, मु‘याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि कर्मचार्यांनी कौतुक केले. विद्यार्थिनींना पुढील यशासाठी शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले. या उत्कृष्ट निकालामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.