मूल मालधक्का प्रकल्पाला ‘ब्रेक’

    दिनांक :10-May-2026
Total Views |
*आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
*प्रदूषण, वाहतूक आणि आरोग्याचा मुद्दा निर्णायक

चंद्रपूर, 
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावितMaldhakka Project  मालधक्का प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, संभाव्य प्रदूषण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता मूल येथे मालधक्का उभारला जाणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, झेडआरयुसीसीचे सदस्य अजय दुबे, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
MUNGANTIWAR
 
Maldhakka Project  मुल शहरातील प्रस्तावित गुड्स यार्ड प्रकल्पामुळे लोह आणि इतर खनिज पदार्थांच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, पिकांचे नुकसान होईल तसेच जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित प्रकल्प त्या ठिकाणी होणार नसल्याचे स्पष्ट करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला दिलासा दिला आहे.