वॉशिंग्टन
war news गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांमधील संभाव्य शांतता कराराबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रि मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह बिटकॉफ यांनी मियामीमध्ये कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. या गुप्त बैठकीत इराणसोबतच्या शांतता करारावर सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यामुळे आता पश्चिम आशियातील युद्धाचे ढग दूर होणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
war news अमेरिका आणि इराण सध्या केवळ एका पानाच्या शांतता प्रस्तावावर चर्चा करत आहेत. हा एक सामंजस्य करार असून, याचा मुख्य उद्देश आधी सुरू असलेले युद्ध थांबवणे आणि त्यानंतर अणू कार्यक्रमासारख्या गंभीर मुद्यांवर सविस्त चर्चा सुरू करणे हा आहे. हा करार झाल्यास मिडल इस्टमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो.
war news कतार आणि पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका
या शांतता प्रक्रियेत कतारची भूमिका अत्यंत कळीची ठरत आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून पाकिस्तान अधिकृत मध्यस्थ म्हणून काम करत आहे. मात्र, कतार पडद्यामागून अमेरिका आणि इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कतारचे पंतप्रधान याआधी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांना भेटले होते. त्यानंतर ते मायदेशी परतण्याऐवजी तातडीने मियामीला रवाना झाले, यावरून या चर्चेचे गांभीर्य लक्षात येईल.