‘नेटफफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर पाेलिसांचा छापा

    दिनांक :10-May-2026
Total Views |
- पहाटेपर्यंत दम माराे दम ; 82 हजारांचा मुद्देमाल जप्त

अनिल कांबळे
नागपूर, 
Police raid 'Netflix and Chill Cafe' शहर पाेलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ माेहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर उशिरा रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाेलिसांनी तब्बल 82 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. रंग दा पंजाब रेस्टाॅरंटजवळील ‘नेटफफ्लिक्स अँड चिल कॅे’ येथे अवैधरित्या तंबाखूजन्य हुक्का ग्राहकांना पुरविला जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.
 

pokdksl 
 
Police raid 'Netflix and Chill Cafe'  त्यानुसार पाेलिसांनी धाड टाकली असता, वेटर साेहेल खान िफराेज खान (22) हा तेथे उपस्थित 19 ग्राहकांना हुक्का उपलब्ध करताना आढळला. कारवाईदरम्यान पाेलिसांनी हुक्का पाॅट, विविध फफ्लेवर्स, धूम्रपानासाठी वापरण्यात येणारे साहित्य, ्रीज, ्रीझर, टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य असा एकूण 82 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा (काेटपा) 2003, महाराष्ट्र पाेलिस कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 272 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील अवैध हुक्का पार्लरविराेधातील कारवाई आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.